महाराष्ट्रसामाजिक

“आम्ही जरी एक परिवार असलो तरी…”, आनंद शिंदेंच्या नातवाची ‘ती’ पोस्ट चर्चेत…

मुबंई : सोनी मराठीवरील नुकतंच बोला जय भीम हा विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदेशाही घराण्याच्या पाचव्या पिढीने संगीत क्षेत्रात पदार्पण केले. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा नातू आल्हाद शिंदे याने या कार्यक्रमात एक गाणं सादर केले. या गाण्याच्या सादरीकरणानंतर आल्हादने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या.
आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श अशी तीन मुले आहेत. उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे हे दोघेही संगीत क्षेत्रात नशीब आजमावताना दिसत आहेत. तर हर्षद शिंदे हा अॅनिमेशन इंजिनिअर आहे. हर्षद शिंदेचा मुलगा आल्हाद शिंदे याने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गाणे सादर केले. यानिमित्ताने शिंदे घराण्याची पाचवी पिढी म्हणून संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत असल्याचे पाहायला मिळाले. आल्हादने नुकतंच याबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button