देश-विदेशमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणात मोठी माहिती समोर;मुख्य आरोपीचे मुंब्रा कनेक्शन उघड….

मुबंई :ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर केल्याचे प्रकरण सध्या देशभर चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाता धक्कादायक अपडेट समोर आली आहे. यातील मुख्य आरोपीचे लोकेशन हे ठाण्यातील मुंब्रा परिसरात असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांचे स्पेशल टास्क फोर्सचे पथक मुंब्रा येथे दाखल झाले आहे. मुख्य आरोपी शाहनवाज खान याचा शोध घेण्यासाठी पोलिस पूर्ण परिसर पिंजून काढत आहेत.
मुंब्रा भागात राहणारा शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवायचा
मुख्य आरोपी शाहनवाज खानच्या शोधासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी थेट ठाणे गाठले आहे. शाहनवाज खान याचा कसून शोध सुरू असल्याची माहिती ठाणे पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुंब्रा भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातून तो तो गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता. गाझियाबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत शाहनवाज मकसूद खान याच्या लोकेशन बाबत खुलासा केला आहे.
गेम मध्ये हरलेल्या मुलींना इस्लाम कबुल करण्यास भाग पडत होता
या गेम मध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम काबुल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार असल्याचे अमिश दाखवत होता. मुंब्रा येथील देवरी पाडा येथे असलेल्या शाझिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शाहनवाज मकसूद खान नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होता. मात्र, तो फरार आहे. गाझियाबाद पोलीस शाहनवाज मकसूद खानच्या शोध घेत असून त्याला अटक करण्यासाठी काही दिवसांपासून मुंब्रा येथील देवरी पाडा येथे आले. मात्र, शाहनवाज मकसूद खान हा आपल्या कुटुंबासह कुठेतरी फरार झाला आहे. शाहनवाजच्या शेजारच्यांनी सांगितले की, त्याच्या घरात तीन भाऊ आणि आई असा परिवार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
गाझियाबादमध्ये, 30 मे रोजी हे स्रव प्रथम हे प्परकरण उघडकीस आले. कवी नगरमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरने कवी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मुलींनी अचानक मुस्लीम धार्मिक विधी करण्यास सुरुवात केल्याने हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी गाझियाबादमधून अब्दुल रहमान नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. चार अल्पवयीन हिंदू मुलांचे धर्मांतर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुलींना जाळ्यात ओढले जायचे. गेम मध्ये हरल्यानंतर त्यांना धर्मांतरासाठी भाग पाडले जायचे. मुस्लीम धर्माचा प्रभाव पडावा यासाठी या मुलींना झाकीर नाईक याचे व्हिडिओ देखील दाखवले जायचे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button