महाराष्ट्रशहरसामाजिक

पिंपरीत आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

पुणे :पिंपरी चिंचवड – विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती दिनानिमित्त ऍड. बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराचे माजी यूवक शहराध्यक्ष गुलाब देवराम पानपाटील व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब यांनी भेट देऊन रक्तदात्यांची विचारपूस केली व आयोजकांचे अभिनंदन केले .

प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्रासोबत पेन ड्राईव्ह भेट देण्यात आले. या रक्तदान शिबिरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच या शिबिरास वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे, उपाध्यक्ष कचरू ओव्हाळ, उपाध्यक्ष धनंजय कांबळे, संपर्क प्रमुख अंकुश कानडी , उपाध्यक्ष अशोक कदम, संघटक बाबूराव फुलमाळी, कोषाध्यक्ष राजेश बारसागडे, जय भारत कुंभारे, आकाश डोंगरे , रमेश गायकवाड, गणेश वाघमारे, यूवक उपाध्यक्ष राहूल बनसोडे, सचिव राहुल इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button