महाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ यांचं विकृतीकरण !

१) बुद्ध म्हणजे महाज्ञानी
बुद्ध म्हणजे आकाशा एवढा ज्ञानी.

आणि आपल्या कडे एखाद्या ढ, बावळट,मंद बुद्धीच्या व्यक्तीला ‘बुद्दु’ म्हणून हिणवले जाते. म्हणजे पहा या लोकांनी बुद्धांचा किती सांस्कृतिक अपमान केला आहे हे लक्षात ठेवा.

२) थेरो म्हणजे ज्या बौद्ध भिक्खू ने आपल्या उपसंपदेची ( भिख्खू बनणे) दहा वर्षे पूर्ण केली अशा बौद्ध भिक्खू ला थेरो असे म्हणतात.
पण अशा वयस्कर बौद्ध भिक्खूच्या थेरो पदा वरुन भारतात म्हातार्या व्यक्तीला थेरडा म्हणून हिणवले जाते.

३) आषाढी पौर्णिमेच्या रात्री तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे आई-वडील महाराज शुद्धोधन आणि महामाया देवी यांचं मिलन झाले होते व त्याच रात्री महामाया देवी यांचा गर्भ स्थिर झाला होता.
पण आपल्या कडे लग्नाच्या पहिल्या आषाढी पौर्णिमेच्या (आखाडी) रात्री नवरा बायको यांचं एकमेकांशी मिलन होऊ नये म्हणून त्यापुर्वी नवरी मुलीला तिच्या वडीलांच्या घरी पाठवले जाते.
४) बौद्ध धर्मात श्रमण परंपरेनुसार बौद्ध भिक्खू यांना घरोघरी अन्न मागुन आपला उदरनिर्वाह करावा लागतो . परंतु आपल्या एखाद्या व्यक्तीने कोणाच्या घरी अन्न मागीतले तर त्याला भिख्खू शब्दावरून भिखारडा म्हणून हिणवले जाते.
५) भगवान गौतम बुद्ध यांना पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञानप्राप्ती झाली होती.त्यामुळे आपल्या कडे पिंपळाच्या झाडावर भुतं ,प्रेत ,मुंजा,हडळ यांचा वास असतो म्हणून कोणीही पिंपळाच्या झाडाखाली बसू नये.किंवा अंगणात पिंपळाचे झाड लावु नये अशी शिकवण दिली जाते.
६) बौद्ध धर्मात सर्व मंगल कार्यात सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.परंतु इथं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणी सर्व लोक पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मरण घरी जाऊन मृतांच्या भोवती बसुन शोक व्यक्त करतात.
७) आषाढी पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सारनाथ येथील मृगदायवनात पंचवर्गीय भिख्खूना आपलं पहिलं प्रवचन दिले होते.तो दिवस बौद्ध धर्मात भगवान बुद्ध या गुरुंनी आपल्या पाच शिष्यांना पहिला धम्मोपदेश केला होता.
त्या दिवसालाच आज ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून परावर्तित केलं आहे.
८)आज भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या ठिकाणी भगवान बुद्धांच्या हजारो मुर्त्या, विहारं, लेण्या, चैत्य विकृत करून त्यांना निरनिराळ्या देवी देवतांची नावे देऊन त्यांना पुजण्यात येते. एकेकाळी संबंध देशात बौद्ध धर्म पसरला होता. त्या बौद्ध धर्माच्या खाणाखुणा भारतात कुठेही उत्खननात तुम्हाला आज रोजी सापडतात.

अशा तऱ्हेने भगवान बुद्धांचा धम्म कलुशीत करण्यासाठी किती तरी प्रकारच्या निरनिराळ्या क्लुप्त्या लढवून बौद्ध धर्माचा पराभव करण्याचें काम केले गेले.

नमो बुद्धाय जयभीम जय संविधान!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button