आर्थिकमहाराष्ट्रशहरसामाजिक

अतिक्रमण धारकांवर झालेला अन्याय दूर करून त्यांचे पुनर्वसन करणे बाबत.

परभणी;महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेच्या माध्यमातून अतिक्रमण धारक वर झालेल्या अन्याय आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. परभणी खूप छोटे शहर असून ग्रामीण भागातील तरुण व शहरी भागातील गोरगरीब व्यापारी हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी छोटे-मोठे व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न करतात यामध्ये छोट्या टपर्‍या हॉटेल हात गाडी या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. 

      दोन वर्षाच्या च्या महामारी नंतर नुकतेच कुठे छोटे-मोठे व्यापारी सुरळीत चालू झाले आहेत त्यामध्ये एकाकीपणे आपण चालू केलेले अतिक्रमण मध्ये यांचे सर्व व्यवसाय उध्वस्त होत आहेत . शिवाय आपण त्यांच्या सामानाची जप्त करत आहात त्यामुळे या सर्व लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत. आपण लक्षातघ्यावे की हे अतिक्रमण ज्यामध्ये चहाची टपरी असतील छोट्या कपड्यांचे व्यापारी असतील व अन्य यामुळे शहरातील व शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना बरच सोयीसुविधा होतात त्यामुळे एकंदरीत ही पूर्ण साखळी आहे समाज व्यवस्थापनाची. त्यामुळे हा अतिक्रमण धारकांसाठी आम्ही अतिक्रमण बचाव कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून आपणास खालील मागण्या करीत आहोत.

१. अतिक्रमण धारकांचे जप्त केलेले सर्व साहित्य तात्काळ त्यांना परत देण्यात यावे.

२. वाहतुकीस अडथळा होत नसलेल्या अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेच्या जागेमध्ये योग्य प्रकारची जागा देऊन त्यांची नोंदणी करून त्यांना व्यापार उद्योग धंदे करण्यास मुभा देण्यात यावी.

३. ज्या अतिक्रमण आल्यावर आहेत असे व्यवसाय असलेल्या नालेसफाई झाल्यावर नंतर नाल्या बंद नाही याची शाश्वती देणारे अतिक्रमणधारकांना तेथे व्यवसाय करण्यास परवानगी देणे.

तरी पण आपणास निवेदन करण्यात येते की आक्रमण धारकांवर झालेला अन्याय तात्काळ शोधून करण्यात यावा अन्यथा येत्या काही दिवसात महानगरपालिकेवर सर्व अतिक्रमणधारकांना घेऊन तीव्र अशा स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button