आरोग्यदेश-विदेशविशेषसामाजिक

भोसे येथील जवान विपुल इंगवले यांचे निधन..

कोरेगाव – गतवर्षी बर्फवृष्टीत सापडून जखमी झालेले भोसे, ता. कोरेगाव येथील लष्करी जवान विपुल दिलीप इंगवले यांचे पुणे येथे लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी निधन झाले.

गेल्या वर्षी सियाचीनमध्ये कर्तव्यावर असताना, बर्फवृष्टीत सापडल्याने ते जखमी झाले होते. त्यांच्यावर प्रारंभी दिल्ली आणि त्यानंतर पुणे येथे सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, वडील, दोन विवाहीत बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील विपुल यांनी गावात माध्यमिक शिक्षण आणि कोरेगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी. भोसले कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले.
त्या काळात उत्कृष्ट बॉक्‍सर म्हणून ते पुढे आले होते. एनसीसी कॅडेट म्हणूनही त्यांनी उठावदार कामगिरी केली होती. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज दि. 6 रोजी सकाळी भोसे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button