आरोग्यआर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

येशू प्रभू कडे चला तुम्हाला आमच्याकडून सर्व सुविधा देऊ..
परभणी मध्ये आश्वासन पर कार्यक्रम..!


परभणी :- (प्रतिनिधी )परभणी जिल्ह्यात ख्रिश्चन धर्माचा (येशूचा) प्रचार व प्रसार करण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून नवख्रिश्चन झालेले मूळ नाव आडनाव ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाची जान न ठेवता अंधश्रद्धेच्या आधार घेऊन येशूची (देवाची) भीती दाखवून प्रचार व प्रसार परभणी मध्ये जोरात चालू आहे. ज्या कुटुंबात कलह असलेली, मानसिक रोगी, सायको, रिकामी कामे, आळशी लोकांमध्ये जाऊन त्यांना शेती, व्यापारासाठी रुपये , केंद्र शासनाची सरकारी नोकरी, न शिक्षण घेता लावण्यात येईल, झोपडपट्टीमधील लागणारे सर्व सुविधा नाली, रस्ता, सर्वांना घरकुल देण्यात येईल असे जालना जिल्ह्या वरून नवख्रिश्चन प्रसारक पाद्री असे आश्वासन देऊन परभणी शहर मध्ये झोपडपट्टी विभागात केंद्र उभे करून देत आहेत जागेची रक्कम देऊन पत्र्याचे शेड टाकून केंद्र चालू केले जातात . त्यामध्ये संगित साहित्य मोठ्या किमतीचे मागविण्यात येते .आशा केंद्रला कोणत्याही प्रकारची शासकीय मान्यता, पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता येथे अंधश्रद्धेचा आधार घेऊन दर रविवारी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये ग्रामीण, शहरी, न शिकलेली, सुशिक्षित लोकांचा सहभाग जास्त आहे. येशूच्या प्रसारा मध्ये रोगी लोकांना कोडे हि जाण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला रोगमुक्त करू, आणि मालमाल करू, दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे, सामाजिक नेत्या बाबत अपशब्दाचा वापर करणे, या केंद्रामध्ये दर रविवार साधारण ५०० ते १००० लोकांचा खर्च करण्यात येतो. हा खर्च कोणती एजन्सी, संस्था देते याबद्दल कोणीही सांगत नाही. मात्र सर्वांना भीती दाखवून धर्मांतर करण्यासाठी मानसिकता बदलण्याचे काम जोरात चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button