महाराष्ट्रविशेषसामाजिक

परभणी पोलिसा तर्फे परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकास जाहीर आवाहन…..


परभणी: परभणी पोलिसातर्फे परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकास जाहीर आवाहन करण्यात येते की दिनांक 27/ 5/ 2023 रोजी परभणी जिल्ह्यातील उखळद या गावात चोर समजून तीन संशयित मुलांना मारहाण केल्यामुळे त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून इतर दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत, त्यामुळे उखळद या गावातील हल्ल्यात सहभागी झालेल्या गावकऱ्यावर कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होऊन हल्ला करणारे गावकरी अटक झाले आहेत.
सदर घटनेच्या अनुषंगाने आपणास परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की आपल्या गावात कुणीही संशयित लोक फिरत असल्यास आपण तात्काळ 112 वर कॉल करून , किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्ष फोन न. 02452226244, 7745852222 येथे कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी. कुणीही चोर समजून संशयित इसमावर हल्ला करणार नाही. सदरचे संशयित लोक हे अनेक कारणासाठी किंवा कोणत्याही कामासाठी आपल्या गावात आलेले असू शकतात किंवा बाहेर राज्यातील कामगार तसेच वीट भट्टी वरील कामगार वगैरे असू शकतात. खोटी अफवा पसरवू नये व खोट्या अफवांना बळी पडू नये. यापूर्वी अनेक ठिकाणी निष्पाप लोकांना चोर समजून मारल्यामुळे गावकऱ्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर.रागसुधा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button