आरोग्यमहाराष्ट्रशहरसामाजिक

परभणीत काचेच्या बाटलीने गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या; मोकळ्या मैदानात आढळला मृतदेह..

परभणी : गळ्यावर काचेच्या बाटलीने वार करून एका २० वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरातील गोरक्षणच्या मोकळ्या जागेत घडली आहे.
आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
यश गोविंद यादव (२०, रा.रमाबाई आंबेडकर नगर, परभणी) असे मयत युवकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी यश यादव हा घरातून जेवण करून बाहेर पडला होता. रात्रीचा सुमारास उड्डाणपूल परिसरातील अनुसया टॉकीज भागात गोरक्षणच्या मोकळ्या जागेवर त्याचा खून झाला. यात त्याच्या गळ्यावर काचेच्या बाटलीने चिरल्याचे खुणा आढळून आल्या. सदरील घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली.
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील जागेची पाहणी करून पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दुपारपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. यात पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. सोमवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मयत युवक यश यादव यांच्या पश्चात आई, वडील, आजी असा परिवार असल्याचे समजते. मयत यश हा मजूरी करत असल्याचे समजले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button