आरोग्यमहाराष्ट्रसामाजिक

पूर्णा तालुक्यात जिल्हाधिकारी, सीईओंची वृक्ष लागवड मोहिम….


परभणी :सोमवार दि 1 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पूर्णा तालुक्यातील फुलकळस, चुडावा आणि हिवरा बुद्रुक अशा विविध ठिकाणी भेटी देऊन वृक्ष लागवड मोहिम राबविली.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळ यांनी घनवन वृक्ष लागवड, शेतकऱ्याच्या शिवारात फळबाग लागवड, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांची लागवड, शाळा परिसर, चुडावा रेल्वे स्टेशन परिसर अशा विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
वृक्ष लागवड मोहिमेसाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर, पूर्णाच्या तहसीलदार पल्लवी टेमकर, गट विकास अधिकारी सुनीता वानखेडे, गट शिक्षणाधिकारी कापसीकर, तालुका कृषी अधिकारी, रेल्वे स्टेशन चुडावा प्रबंधक, फुलकळ, चुडावा, हिवरा येथील सरपंच, ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या की, पर्यावरणाच्या संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक फळबाग लागवड केल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ तर होईलच पर्यायाने पर्यावरणाचे संतुलन देखील राखले जाईल.
तसेच स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाद्वारे दि 13 ते 15 ऑगस्ट 2022 रोजी घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आणि येणारा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे बोलताना म्हणाले की, वृक्ष लागवडी बरोबर वृक्ष संवर्धन देखील महत्त्वाचे आहे. केवळ समाजाला दाखविण्या पुरते वृक्ष लागवड न करता त्याची जोपासना देखील प्रत्येकाने केली पाहिजे. पर्यावरण बदल आणि जागतिक तापमान वाढ थांबविण्यासाठी झाडे लावून ती जगावाविच लागतील नाहीतर आपले मरण अटळ आहे असे उदगार यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button