महाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

मुसलमानांची भिती दाखवत ओबीसींचे अधिकार हिसकावून घेतले..अॅड बाळासाहेब आंबेडकर ..

दिनांक :- १७ सप्टेंबर २०२२ ला मराठवाड्यातील वेरुळ येथे विश्वकर्मा समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते…!!

त्या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी विश्वकर्मा समाजाला मार्गदर्शन करतांना म्हटले की, इथं काही राजकीय पक्ष धर्माच्या नावाने राजकारण करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून हिंदू-मुस्लिम द्वेषाची पेरणी केली जाते…!!

मुसलमानांची भीती इथल्या सर्वसामान्य हिंदू धर्मातील ओबीसी, अलुतेदार बलुतेदार समूहाला दाखविली जाते आणि मते घेऊन सत्तेत बसलेल्या राजकीय पक्षांनी ओबीसी समाज बांधवांचे राजकीय आरक्षण संपविले आहे…!!

  मुसलमानांची भीती दाखवून ओबीसी समुहाचे हक्क आणि अधिकार काढून घेतले जातं आहेत, सरकारी उद्योग विकून खाजगीकरण आणले जातं आहे हे लक्षात घेऊन यापुढे ओबीसी बांधवांनी धर्माचे राजकारण करण्यापेक्षा आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नावर राजकारण केले पाहिजे...!! 

सदर मेळाव्याचे आयोजन मा. नागोराव पांचाळ यांनी केले होते, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष योगेश बन, आणि मराठवाड्यातील अनेक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यक्रमाला हजर होते…!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button