महाराष्ट्रविशेषसामाजिक

547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमोजणी, कोण बाजी मारणार? उत्सुकता शिगेला…

मुबंई : 19 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. एकीकडे राज्यात वेदांतावरून वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.
आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. तसेच आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायतींचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर पहिल्यांदाच सरपंचपदाची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने, या ग्रामपंचायत निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निकालांकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. पुणे, नाशिक, नांदेड, धुळे, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, या जिल्ह्यांसह एकूण 16 जिल्ह्यांमधील ग्रामपचायत निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button