आरोग्यआर्थिकमहाराष्ट्रविशेषसामाजिक

ख्रिश्चन धर्मात होणारे धर्म परिवर्तन रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील गावागावात जाऊन समाज प्रबोधन रॅलीचे आयोजन…

वाशिम:-(पी.एस.खंदारे) वाशिम जिल्ह्यातील आदिवासी व अनुसूचित जाती मधील गोर गरिब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेवून व विविध प्रकारचे अमिश देऊन, रोजगार व नौकरी, असाध्य रोग दुरूस्ती करण्याचा दावा करत वाशिम जिल्ह्यातील आदिवासी व बौद्ध, आणि अन्य जाती धर्मातील लोंकाच्या असाहाय्यतेचा फायदा घेवून तुमचे आजार बरे करतो, तुमच्या मुलाला नौकरी लागेल असे दावे करत तुम्ही प्रभु येशु ख्रिश्र्चन च्या प्रार्थनेत सामील व्हा व अमुक अमुक इतके दिवस आम्ही दिलेले पुस्तक वाचा इतक्या दिवसात तुमच्या इच्छा आकांक्षा पुर्ण होतील व विशेष म्हणजे तुमच्या घरातील असलेली विविध देवी देवताच्या व महापुरूषांचे फोटो, मुर्ती, घरात ठेऊ नका व त्यांची पुजा अर्चा करू नका ते सैतान आहेत आपण फक्त येशू ख्रिस्त वरच विश्वास व श्रद्धा ठेवायची आहे. अन्य कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे नाही, प्रसाद घ्यायचा नाही असी सक्त ताकीद देखील दिल्याचे काही मंडळी सांगत होते.
हि भावी पिढ्यांना धोक्याची घंटा असल्याने आदिवासी व अन्य समाजाचे ख्रिश्चन धर्मात होणारे धर्म परिवर्तन रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील गावागावात जाऊन समाज प्रबोधन रॅली चे आयोजन करण्यात आले होते या रॅली चे मुख्य नेतृत्व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी पोलिस अधीक्षक जानकीराम डाखोरे,माजी जिल्हा नियोजन अधिकारी डाॅ. एम.बी. डाखोरे, माजी जिल्हाधीकारी रघुनाथ चाफे, प्राचार्य प्रकाश खुळे, गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव घोरसडे, माजी पंचायत समिती सभापती चंदूभाऊ भुजाडे, जिल्हा परिषद सदस्य गणेश झळके, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी एस खंदारे वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,सामाजिक कार्यकर्ते बाबाराव साखरे, अंकुश ठाकरे, मुकींदा शेळके, संतोष शिंदे, गजानन मेथळे, रामदास डाखोरे, राजेश डाखोरे, संतोष ठाकरे, हरिदास करवते, रामचंद्र लोखंडे, विलास धोंगडे, देवानंद चवरे, शामराव ठाकरे, रामराव करवते, रामदास लठाड, उत्तमराव पवार, मोहन शेळके, अनिल चवरे, नंदू देवकर, गोपाल जामकर, प्रदीप चवरे, देवानंद शेळके, मनोहर देवकर, वसंतराव शिंदे, अनिल डुकरे, प्रविण करवते, आत्माराम धंदरे, जिवन हगवणे, सुदाम भोंडणे, वसंतराव भोंडणे, सुभाष धोंगडे, झळके गुरूजी, कैलास ढगे, महादेव साखरे,नाजुकराव भोंडणे, केशव शिंदे, आनंदराव पवार, विजय भुरकाडे, किसनराव करवते, अरविंद साखरकर, गजानन होलगरे, आनंदराव खुळे, राजेश व्यवहारे, पोलिस पाटील गजानन गि-हे, जनार्दन झळके, अरविंद वाघमारे, दिलीप अंभोरे,मनसे महिला आघाडी प्रमुख सीताबाई धंदरे आदी सहभागी होते वरील सर्व मान्यवर मंडळीनी वाशिम जिल्ह्यातील जऊळा रेल्वे, अमानवाडी, कुत्तरडोह, मुसळवाडी, खैरखेडा आदी गावात जाऊन धर्म परिवर्तन करणारे व्यक्ती अथवा कुटुंबांची व गावकरी मंडळी,युवा मंडळी सोबत चर्चा करून धर्म परिवर्तन रोखण्यासाठी जनसंवाद रॅली च्या माध्यमातून बिरसा मुंडा,महामानव विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर, मुंगसाजी माऊली, संत गाडगे बाबा,राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची शिकवण व विचार घेऊन व शैक्षणिक विकासासाठी चे प्रयत्न करून आपण आपल्या समाजाची प्रगती करू शकतो, ख्रिश्चन धर्मात जाऊन व प्रलोभनाला बळी पडून आपली अधोगती होईल हि धोक्याची घंटा असल्याने आदिवासी व अन्य समाजाचे ख्रिश्चन धर्मात होणारे धर्म परिवर्तन रोखण्यासाठी प्रयत्न होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button