देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

धम्मभूषण प्रा ज्योती धुतमल पंडीत यांनी पटकावला “वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक सप्टेंबर2022 ” अवॉर्ड..

परभणी : शहरातील परभणी  येथे वास्तव्यास असलेल्या प्रभात नगर ,नांदेड भूमि कन्या श्रीमती सरस्वतीबाई धोंडीराम पंडित यांच्या कन्येने गाजविला विश्वविक्रम !!! प्रख्यात साहित्यिका ,लेखिका, कवयित्री ,नाट्यलेखिका, गीतकार   धम्मभूषण प्रा ज्योती  अनिल धुतमल पंडित यांच्या "आणि माझा बुद्ध बोलला !" या 10,000 शब्द आणि सलग यमक बद्ध 2080  ओळी असलेल्या महधम्मकव्याला वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक 2022  अवॉर्ड दिनांक 26 09 2022 रोजी  औरंगाबाद येथे वर्ल्ड रेकॉर्ड बुक इंडियाचे अध्यक्ष आदरणीय पवनकुमार साळुंकी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . सलग 2080 ओळींचे हे महा धम्म काव्य  टीम ने सर्वेक्षण करून  अभ्यास करून  भारतातील पाहिले मराठी धम्मकाव्य असल्याचे घोषित करून प्रा ज्योती धुतमल याना या लिखानाबद्दल कौतुक, अभिनंदन करूण हे धम्मकाव्य निर्माती "प्रथम भारतिय महिला"म्हणून सन्मानित केले असून"महाकवियित्री"म्हणून जाहीर करून हा सन्मानाचा  वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक अवॉर्ड " सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला  . या भारतिय  अमृत महोत्सवा  प्रसंगी प्राविण्य पूर्ण  ऐतिहासिक  कार्य करून आपले नाव आणि शहराचे नाव  वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक  मध्ये भारतिय प्रथम महिला  म्हणून ,नांदेड,  .परभणी, आणि सर्व स्तरातुन  प्रा ज्योती धुतमल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button