आरोग्यआर्थिकविशेषसामाजिक

वृद्ध आश्रम हि संकल्पनाच नष्ट झाली पाहिजे…..


वाशिम (प्रतिनिधी ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यालय वाशिमच्या वतीने सेवा पंधरवडा उपक्रमानंग्रत जेष्ठ नागरिक दिन मोठ्या थाटात साजरा झाला या वेळी एनडीएमजे चे राज्य सहसचिव तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष पी. एस.खंदारे हे बोलताना म्हणाले की, भारत हा थोर समाज सुधारक व संत महापुरूषांचे विचारांची परंपरा लाभलेला देश आहे. प्रत्येक धर्माने आई वडीलांची सेवा करण्याचा उपदेश केला आहे, संताची देखील शिकवण होती की, तीर्थक्षेत्र, वारी व चारी धाम न करता आई वडीलांची सेवा केल्यास जे पुण्य लाभते ते तिर्थ यात्रा केल्याने लाभत नाही. आई वडील हेच आपले दैवत आहेत त्यांची जिवंतपणी सेवा करावी, लहानपणी आपले नको तेवढे लाड पुरवत आपल्याला शिक्षण देऊन मोठे करतात मात्र शिकून सवरून मोठ्या पदावर गेल्यावर आई वडील यांना वृद्ध आश्रमात ठेवण हि गंभीर व चिंतनाची बाब आहे, मुले कितीही खोडकर असली तरी ती आई वडिलांना जड जात नाही परंतु मुले मोठी झाल्यावर आई वडील भावाभात वाटून घेतात किंवा धनसंपती असुनही वेगवेगळ्या खोलीत अथवा मंदिरात ठेवले जाते त्या मुळे मुलीला जसे आपले आईवडीलांची काळजी वाटते तीच काळजी तिने सासु सासरे यांची घेतली तर वृद्ध आश्रम हि संकल्पनाच नष्ट होईल व समाज सृजनशील होईल आधुनिक समाज जेवढा प्रगतशील झाला परंतु मानुसकी लोप पावत आहे ती जपण्यासाठी आपल्या संत समाज सुधारकांचा विवेकी वारसा समाजात रूजवून आपण आपल्या माता पित्याची सेवा करण्याचा मौलिक संदेश पी. एस. खंदारे यांनी दिला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ समाज सेवक तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त सु. ना. खंदारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष परसराम जाधव, रामपाल मंत्री, प्रा. संघानी मॅडम, जगदीश गाभणे, प्रकाश गवळीकर, वनमाला पेंढारकर, शाहिर संतोष खडसे, अविनाश कांबळे, अतुल पाटील, ज्ञानेश्वर टेकाळे सह जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस महामानव विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमाचे पुष्पमाला अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली उद्घाटन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वाशिम चे मारोती वाठ यांनी केले, सुत्रसंचालन प्रा. हिवसे यांनी तर आभार राहुल शिरभाते यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वाशिम चे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button