साप्ताहिक बुद्ध वंदना

हिंगोली :रविवारी दि. 09 ऑक्टोबर 2022 रोजी सिद्धार्थ नगर येथील सिध्दार्थ बुद्ध विहारमध्ये (क्र.47 वी) “साप्ताहिक बुद्ध वंदनेचे” आयोजन आयु. श्रीकांत मगरे व मित्र मंडळ यांनी केले होते.
सदर कार्यक्रमास सर्व प्रथम बुद्ध वंदना घेऊन नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 09 मार्च 1924 रोजी ” सात कोटी अस्पृश्य हिमालय जमीनदोस्त करतील ” या विषयावर दिलेल्या भाषणाचे वाचन आयु. लक्ष्मण पाईकराव यांनी केले. त्यानंतर आयु. जी.जी.धुळे यांनी मनोगत व्यक्त केले व धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी आयु. नितीन बबन खिल्लारे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुध्द आणि त्यांचा धम्म ” या ग्रंथाची प्रत देऊन भारतीय बौध्द महासभेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे औंढा तालुकाध्यक्ष आयु. राहुल घोंगडे यांनी, प्रास्ताविक आयु. दानपाल मोरे यांनी केले. तर आयु. ॲड. प्रकाश मगरे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी आयु. मिना भुक्तर, आयु. निकीता बलवंत मोरे, आयु. शांताबाई मारे, आयु. इंदुमती भिमराव मोंबडे आयु. अंबुबाई शिंदे, आयु.सरस्वतीबाई सुर्यतळ, आयु. मिना खंडागळे, आयु. शोभाबाई धांडे, आयु. चंद्रकलाबाई धुळे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु. सुभाष एन भिसे, आयु. संजय धारबाजी वाढवे, आयु. सिध्दार्थ रंगराव पंडीत, आयु. भारतभुषण नारायणराव रणवीर, आयु. राजेंद्र नरवाडे, आयु. त्र्यंबक मेसाजी पोघे, आयु. रत्नाकर कांबळे, आयु. अमर मोरे, आयु. श्रीरंग सिरसाठ, आयु. अजय भालेराव, आयु. सिताराम नरवाडे, आयु. शिवाजी राघोजी पारखे, आयु. पुंडलीक नामदेव पाईकराव, आयु. सोपान देवबा पठाडे, आयु. जी.एफ. कांबळे, आयु. सोपान देवबा पठाडे, आयु. वंसता किसन बगाटे, आयु. रमेश संभाजी पंडीत, आयु. आनंदराव पडघन, आयु. विनोद श्रीरंग पाईकराव, आयु. गजानन मुरहारी कांबळे, आयु. डी.के. पठाडे, आयु. सुदाम उत्तम पंडीत, आयु. आर.बी.वाढे, आयु. विजयकुमार शिवाजी कांबळे, आयु. ॲड. महासेन प्रधान, आयु. युवराज खंदारे, आयु. अजय भुक्तर, आयु. राजरत्न बाबुराव पुंडगे, आयु. आश्विन संतोष प्रधान, आयु. विनोद प्रकाश कांबळे, आयु, गणेश सुदाम मोरे, आयु. मिलींद गौतम खंदारे, आयु. धम्मपाल नरेंद्र मगरे, आयु. नितीन बबन खिल्लारे, आयु. अविनाश ढोले, आयु. विनीत बन्सी उबाळे, आयु.भास्कर कोंडबाराव वाकळे, मोठ्या संखेने उपासक -उपासिका उपस्थित होते.