महाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

राजकिय पक्षांनी शिक्षक मतदार संघात निवडणूक लढु नये माजी आ.विजयराव गव्हाणे…


परभणी: अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन सर्वानांच जुनी पेन्शन लागु करावी,राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार अनुदान देऊन शिक्षकांची वेठबिगारी संपवावी,राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांना 10-20-30 अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागु करावी,सर्व शिक्षक पाल्यांना मोफत शिक्षणाचा आदेश लागु करावा या मागण्यांसाठी क्रांतीबा ज्योतिबा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी असा भव्य मोर्चा पी.एस घाडगे,सुर्यकांत विश्वासराव,राजकुमार कदम डी.एस वरवट्टे,जी.डी.पोले यांच्या नेतृत्वात मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने संपन्न झाला.
मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्या वर मार्गदर्शन करतांना महाराष्र्ट राज्य संस्थाचालक महामंडळाचे राज्य सर कार्यवाह माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी पुरोगामी महाराष्र्टातील शैक्षणिक धोरण बदलण्याची गरज प्रतिपादीत करुन शिक्षक मतदार संघात राजकिय पक्षांनी निवडणुक लढु नये अश्या भावना व्यक्त केल्या.
प्रास्ताविक परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरद यांनी सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन सहसचिव निशांत हाके यांनी केले या वेळी मंचावर *के.पी. कनके,बी.टी..सांगळे,विक्रम कदम,आर.एन.सुर्यवंशी,बी.एस. पुर्णे,यु.आर.थोंबाळ,
या मोर्चात परभणी जिल्ह्यातील शिक्षक हजारोंच्या संख्येने ऊपस्थित होते.
मोर्चाच्या यशस्वीते साठी एन.टी.कदम,डी.के देवकते,संतोष साखरे, बी.यू.फड,सिताराम ठाकरे,पी.एस.जाधव,पी.डी.भरणे, वसेकर के. एस.,गिरी सर,शिवाजीराव गूट्टे,माधवराव शिंदे,सुभाष भगत,राजेश्वरराव जाधव,ज्ञानेश्वर कौसडीकर,लक्ष्मीकांत थोरे,मासोळे सर,एस एन डोंगरे,सौ.एम.पी.होंडराव,सौ.यु.बी.
शिंदे, सौ. यु.एस परगे,अनिता मनोहरे,यांनी विशेष परिश्रम केले. या भव्य मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा देऊन सहभाग दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button