
वाशिम: भिम शक्ती मंडळ काटा व गावकरी मंडळी काटा च्या वतीने चवदा आक्टोबर धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने थोर समाज सुधारक तथा निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या विचाराचा जागर करून समाज प्रबोधन करण्यासाठी वाशिम जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात आधुनिक गाडगे बाबा म्हणून ओळख निर्माण झालेले सामाजिक कार्यकर्ते तथा जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिम चे अशासकीय सदश्य पी.एस.खंदारे यांच्या प्रबोनात्मक कार्यक्रम व विविध चित्तथरारक जादुचे प्रयोग व या मागील विज्ञान समजावून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम जिल्हा शाखेचे अध्यक्ष तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिम चे डाॅ. रामकृष्ण कालापाड, जिल्हा सचिव प्रा. महेश देवळे, विविध कार्यक्रम विभाग प्रमुख नाजुकराव भोंडणे, मूकनायक विचार मंचाचे अध्यक्ष राजीव दारोकार,उपाध्यक्ष सुखदेव काजळे, बुवाबाजी विभाग प्रमुख तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा दत्तराव वानखेडे, अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव डाखोरे सह काटा येथील पोलिस पाटील सुभाष कांबळे, प्रा. हरिदास बनसोड,संजय कांबळे, संघपाल बनसोड, बालु बनसोड, आदी उपस्थित राहतील, काटा गावकरी मंडळी सह पंचक्रोशीतील मंडळी नी प्रबोधन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भीमशक्ती मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.