आरोग्यआर्थिकदेश-विदेशसामाजिक

पोलीस अन् गावकऱ्यांमध्ये तुफान राडा! भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू….

उत्तराखंड: ५० हजारांचे इनाम असलेल्या वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या उत्तर प्रदेश पोलिस दल आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

या घटनेत ब्लॉक प्रमुखाच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या चकमकीत SHO सह पाच पोलीस जखमी झाले आहेत. यातील दोन पोलिसांना गोळ्याही लागल्या आहेत.

नक्की कसा घडला प्रकार?
५० हजारांचे इनाम असलेल्या खाण माफियाला पकडण्यासाठी उत्तराखंडच्या काशीपूरच्या कुंडा गावात यूपी पोलीस त्याचा पाठलाग करत होते. खाण माफियाचा पाठलाग करताना माफिया जफरने उत्तराखंड सीमा ओलांडून जसपूरमध्ये प्रवेश केला. या दरम्यान जफर आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस पथकावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ब्लॉक प्रमुख गुरताज भुल्लर यांची पत्नी गुरप्रीत कौर यांना गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button