महाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

मानव जातीला काळीमा फासनारा.”काळा दिवस” खैरलांजी हत्याकांड …

महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या खैरलांजी गावात घडले. या दिवशी गावातल्या एका कुटुंबातल्या चार जणांची सायंकाळच्या सुमारास गावातल्याच काही लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली.[१] घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल सप्टेंबर १५ २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले. या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे २० जानेवारी २०१७ रोजी हृदयविकाराने निधन झाले.[२]या घटनेने राज्यातील कायदा व सुव्यवस्था, तपासयंत्रणा तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. या घटनेचा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे राज्य शासनाने सप्टेंबर १६ २००८ रोजी दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी दूर करण्यासाठी एक समिती स्थापन केली.

गुन्हेगारांनी हा गुन्हा करताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे हे दलित हत्याकांड नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला १५ सप्टेंबर, इ.स. २००८ रोजी भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ११ पैकी ८ आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला आहे.[३]

न्यायालयाने पुढील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली : गोपाल सक्रू बिंजेवार, शिशुपाल धांडे

न्यायालयाने पुढील आरोपींना २५ वर्षाच्या जन्मपेठेची शिक्षा सुनावली : सक्रू बिंजेवार,शत्रुघ्न धांडे,विश्‍वनाथ धांडे,प्रभाकर मंडलेकर,जगदीश मंडलेकर,रामू धांडे.

न्यायालयाने पुराव्याअभावी पुढील ३ आरोपींना सोडून दिले : महिपाल धांडे,धर्मपाल धांडे,पुरुषोत्तम तितीरमारे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button