आरोग्यमहाराष्ट्रसामाजिक

माझ्याशी बोल नाहीतर संसार मोडेल, धमकी देत ऊसतोड कामगार महिलेवर अत्याचार…

बीड : भंडाऱ्यात महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर आता बीडमध्येही एका ऊसतोड कामगार महिलेवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. भंडाऱ्यातील सामूहिक बलात्काराची घटना उघड झाली असतानाच, बीडमध्येही एका विवाहित महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपी हा पीडितेला तिचा संसार मोडण्याची धमकी देत होता, अशी तक्रार पीडितेने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुझा संसार मोडणार अशी धमकी आरोपी या महिलेला देत होता. पीडित विवाहित महिला २९ वर्षांची आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, ती पतीसोबत ऊस तोडणीला गेली होती. त्या ठिकाणी उसतोडणीला आलेला आरोपी राम याच्यासोबत तिची ओळख झाली होती. ऊसतोडणी करून परत आल्यानंतर राम हा वारंवार तिला फोन करत होता.
तिला सतत त्रास देत होता. त्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यावर तू माझ्याशी बोलली नाहीस तर, तुझा संसार मोडेन, अशी धमकी तो देत होता. तसेच पीडितेला बळजबरीने लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी रामविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button