क्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

खूशखबर! 14956 पोलीस भरतीची जाहिरात निघाली, एक नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरु….

मुबंई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत.
या प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यात मुंबई पोलीस दलात सहा हजार 740 पदे रिक्त असून संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
तीन नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
कुठे किती जागा आहेत?
मुंबई – 6740
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720
पिंपरी चिंचवड – 216
मिरा भाईंदर – 986
नागपूर शहर – 308
नवी मुंबई – 204
अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई – 620
ठाणे ग्रामीण – 68
रायगड -272
पालघर – 211
सिंधूदुर्ग – 99
रत्नागिरी – 131
नाशिक ग्रामीण – 454
अहमदनगर – 129
धुळे – 42
कोल्हापूर – 24
पुणे ग्रामीण – 579
सातारा – 145
सोलापूर ग्रामीण – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड – 155
परभणी – 75
हिंगोली – 21
नागपूर ग्रामीण – 132
भंडारा – 61
चंद्रपूर – 194
वर्धा – 90
गडचिरोली – 348
गोंदिया – 172
अमरावती ग्रामीण – 156
अकोला – 327
बुलढाणा – 51
यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण – 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
अनुसूचित जाती – 1811
अनुसूचित जमाती – 1350
विमुक्त जाती (अ) – 426
भटक्या जमाती (ब) – 374
भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) – 292
विमुक्त मागास प्रवर्ग – 292
इतर मागास वर्ग – 2926
इडब्लूएस – 1544
खुला – 5468 जागा
एकूण – 14956

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button