आर्थिकमहाराष्ट्रविशेषसामाजिक

जातीय अत्याचारात खुन झालेल्या पिडीत कुटुंबांचे शासनाने पुनर्वसन करावे

नागपूर :-दिक्षाभूमी नागपूर येथे पी एस खंदारे यांनी जनतेला पत्र लिहिण्याचे केले आवाहन

नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य महासचिव एड. डाॅ.केवल ऊके यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सचिव वैभव गिते यांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नात एट्रोसीटी कायदा अंतर्गत जातीय अत्याचारात खुन महाराष्ट्रात मागिल दहा वर्षात सहाशे बत्तीस खुन झालेल्या कुटुंबांचे शासकीय नोकरी देऊन पुनर्वसन करण्याची शपथ घेऊन ती पुर्ण करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांची भेट घेऊन चर्चा करून सातारा, सांगली, हिंगोली आदी जिल्ह्यातील पिडीत कुटुंबांचे पुनर्वसनाची प्रक्रिया पुर्ण झाली आहे.
ऊर्वरित सर्व जिल्ह्यातील पिडीत कुटुंबांचे पुनर्वसनाची करण्यासाठी जनतेने एनडीएमजे च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवावे तसेच अनुसूचित जाती जमाती च्या न्याय हक्कासाठी चा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास कामाचा निधी अखर्चित राहु नये, इतरत्र वळवला जाऊ नये म्हणून बजेट चा कायदा पारित करण्यासाठी मुख्यमंत्री यांना पोस्ट कार्ड व हजारो निवेदन पाठवावे असे आवाहन दिक्षाभूमी नागपूर येथे जमलेल्या जनसमुदायास केले आहे. यावेळी जेष्ठ विचारवंत तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मंगेश दहिवले, बुलढाना येथील एनडीएमजे चे आर. एस.खेलबाडे, मोरे सर, हिंगोली जिल्हा मार्गदर्शक दलित मित्र बबनराव मोरे, एनडीएमजे च्या कुसुमाताई सोनुने, विद्रोही कलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button