महाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

शहीद डाॅ नरेंद्र दाभोलकर यांच्या जयंती दिनी विवेक जागर दिन व चमत्कार सादरीकरण कार्यशाळा चे आयोजन..

वाशिम: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डाॅ नरेंद्र दाभोलकर यांचा एक नोव्हेंबर रोजी जन्म दिन आहे. हा दिवस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने विवेक जागर दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी देखील वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने चमत्कार सादरीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ज्या ज्या युवक व युवती तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करण्याची इच्छा असणारे सर्व वयोगटातील स्री पुरूष, शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि शिक्षक तथा सर्व सामान्य जनतेला खुला व मोफत कार्यशाळा मध्ये सहभागी होता येणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिम चे डाॅ. रामकृष्ण कालापाड यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिम चे पी एस खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कार्यशाळा एक नोव्हेंबर मंगळवारी सकाळी अकरा वाजता डाॅ. रामकृष्ण कालापाड यांच्या निवासस्थानी जुनी आय.यु. डी. पी. बंग हाॅस्पीटल, हनुमान मंदिराच्या शेजारी वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे जिल्हा सचिव प्रा. महेश देवळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button