नगर सेवक कंत्राटदार व इंजिनिअर यांच्या संगनमताने दलित वस्तीच्या फंडात सावळा गोंधळ…चौकशी झाली नाही तर आत्मदहन करणार -रामप्रसाद भोले.

बीड :माजलगाव शहर व प्रभाग क्रमांक बारा मध्ये रस्ते नाल्याचे निकृष्ट व बोगस कामे करून कंत्राटदार व नगरसेवक इंजिनीअर यांच्या संगनमताने सर्रास पणे बिले उचलण्यात आली तर काही ठिकाणी काम न करताच बिले घशात घालण्याचा प्रयत्न चालू असून या संबधित लोकांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी झोपडपट्टी संघर्ष समितीचे अध्यक्ष रामप्रसाद भोले यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे..
या बाबत सविस्तर माहिती अशी की..
प्रभाग क्रमांक 12 हा पूर्णता दलित वस्ती चा वार्ड आहे..मात्र कार्यारंभ आदेश टेंडर व इतर कागदपत्रे एकाच्या नावाने तर दुसराच कंत्राटदार बोगस व निकृष्ट व थातूरमातूर कामे करून बिले मात्र पूर्ण उचलली जात आहेत. वार्डमधील एखाद्या.नागरिकाने या संदर्भात काही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तिला कंत्राटदार धमक्याही देत आहेत…
प्रभागात झालेल्या कामांची क्वालिटी कंट्रोल थर्ड पार्टी कामाच्या पाहणीचा अहवाल अश्या सर्व संचिका एकत्रित करून आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांची पूर्ण चौकशी करूनच बिले अदा करण्यात यावी..वेळ प्रसंगी न्यायालयात दाद मागण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली आहे…यात कोणत्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले काम कोण करत आहे प्रशासकीय काळात व 2017 ते 2022 या कार्यकाळात जी देयके दिली याच्या संचिका मागण्यात आल्या आहेत…
जर इंजिनीअर नगरसेवक व कंत्राटदार यांच्या संगनमताने बिले उचलली असतिल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रामप्रसाद भोले हे नगर परिषदे समोर आमरण उपोषण करणार असून उपोषणे करून देखील कार्यवाही केली नाही तर चोवीस तासांचि नोटिस देऊन माजलगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आत्मदहन करणार असल्याचे निवेदन नगर परिषद प्रशासन व जिल्हाधिकारी यांना दिले आहे..