महाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

देवाची पूजा करता म्हणत जात वैधता प्रमाणपत्र नाकारले; आता कुटंबाने घेतला वेगळा निर्णय…

नांदेडः देवपूजा करता म्हणून जातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारले, असल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. प्रशासनाच्या या अजब निर्णयावर संताप व्यक्त करत घरातल्या देव्हाऱ्यासह देव सरकारच्या हवाली करण्याचा निर्णय महादेव कोळी समाजाने घेतला आहे. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देव्हारे आणि देव सरकारच्या हवाली करणार.
नांदेड जिल्ह्यातील खरटवाडी या गावातील मयुरी पुजरवाड या डॉक्टर असलेल्या मुलीचे औरंगाबाद जात पडताळणी कार्यालयाने महादेव कोळी या जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. हे जात प्रमाणपत्र अवैध ठरवताना औरंगाबादच्या जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाने अनोखा निकष लावला आहे, असा आरोप महादेव कोळी समाजाने केला आहे.

हिंदू देव-दैवतांची तुम्ही पूजा करता. त्यामुळे तुमची महादेव कोळी ही जात अनुसूचित जमातीमध्ये मोडत नाही, असं म्हणत डॉक्टर मयुरी पुजरवाड हिचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. या निर्णया नंतर नांदेड जिल्ह्यातील महादेव कोळी समाज आक्रमक झाला आहे.
औरंगाबाद जात पडताळणी कार्यालयाच्या विरोधात नांदेडमध्ये महादेव कोळी समाजाच्या वतीने अनोख आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महादेव कोळी समाजाच्या वतीने मोर्चा काढून हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आणि देवांचा देव्हारा घेऊन हे समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला हिंदू देव-देवतांच्या मूर्तीसह देवांचा देव्हारा देखील भेट देण्यात येणार आहे. दरम्यान हा मोर्चा नांदेड शहरातील आयटीआय इथून निघणार आहे. शहरातील आयटीआय ते शिवाजी नगर, वजीराबादमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या अनोख्या आंदोलनात जिल्हाभरातील महादेव कोळी समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती महादेव कोळी समाजाचे नेते परमेश्वर गोणारे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button