नांदेड : धम्म परिषदेसाठी आलेले बौद्ध अनुयायी हा अशोकस्तंभ पाहण्यासाठी इथे हजेरी लावत आहेत.
नांदेड शहरातील चौकाचौकातून ढोल ताशांच्या गजरात, लेझीम पथकासह बौद्ध भिक्खू आणि हजारो बौद्ध अनुयायांनी या धम्म रॅलीत हजेरी लावली.
या अखिल भारतीय धम्म परिषद स्थळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात मोठ्या अशोकस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे.
यासाठी उत्तर प्रदेशातील सांची या ठिकाणाहून आणलेल्या संगमरवरी लाल दगडातून 72 टन वजनी अशोकस्तंभ उभारण्यात आला आहे.

गेल्या 40 वर्षा पासून भारतातील सर्वात मोठ्या अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील दाभड या ठिकाणी करण्यात येते.

या अखिल भारतीय धम्म परिषदेसाठी चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, नेपाळ जगभरातून बौद्ध भिक्खू धम्मदेशना देण्यासाठी दाखल झाले आहेत.