आरोग्यमहाराष्ट्रसामाजिक

समाजहित अभियान प्रतिष्ठान व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान…

परभणी ( जि. प्र.) शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान व
रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णास B+ पॉझिटिव्ह रक्त गटाची आवश्यकता होती तेव्हा समाजहित अभियान प्रतिष्ठान चे सदस्य राहुल खंदारे यांनी आज दिनांक 27 जुलै रोजी पावसाची पर्वा न करता भर पावसात परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून मेट्रो ब्लड बँक येथे वेळेत रक्तदान करून गरजू रुग्णास रक्त उपलब्ध करून देऊन रुग्णाचा प्राण वाचवण्यात मदत केली आहे.
रुग्णास वेळेत रक्त उपलब्ध करून दिल्या बद्दल समाजहित अभियान प्रतिष्ठान व रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने रक्तदाता राहुल खंदारे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, सहकार्याध्यक्ष सिने कलावंत हाफिज उर रहेमान उपाध्यक्ष शेख सरफराज, भिमा कोरेगाव मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ, नितीन मुंजाजी खंदारे, नितीन यादवराव खंदारे, आकाश हरणे आदी उपस्थित होते.
तसेच ब्लड बँक क्लास वन वैद्यकीय अधिकारी डॉ.बडे, बी.बी.एस.ओ. अनिल सावंत, बी.बी.एस.ओ. हाशमी साहेब, विठ्ठल शिंदे, दीपक कंडेरे, किशोर जाधव, हमीद सिद्दीकी, माधव गोचडे, अतुल जाधव, आत्माराम जटाळे, मारोती क्षिरजवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
त्याच बरोबर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन समाजहित अभियान प्रतिष्ठान व रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने शहरातीत रक्तदात्यांना रक्त दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button