महाराष्ट्रविशेषसामाजिक

विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात आंबेडकरवाद्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही….डॉ प्रकाश डाके


परभणी : आपला मित्र कोण व शत्रू कोण हे ओळखून चळवळीतील मित्रा सोबत आपल्या विचारधारेच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी आरक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे मा.एम.एम. बरे होते.
विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात आंबेडकरवाद्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला सारून महापुरुषांच्या सन्मानासाठी व समाजाच्या कल्याणासाठी एकत्र या, एकजूट व्हा. असे आवाहन बौद्ध विहार समन्वय समितीचे मा.एन जी खंदारे यांनी केले.मा. डॉ.बी.टी.धुतमल सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित मातृसंघटनेचे सदस्य प्रत्येकाने झाले पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांनी बौद्ध असलेल्या सर्वांना संस्थेचे मातृसंस्थेचे सभासद करून घेणे घेतले पाहिजे असी सूचना केली.
आदर्श शिक्षक मा दि फ लौंढे यांनी छत्रपती शाहु महाराज यांच्या विषयी माहिती दिली.
या बैठकीस भीमशक्तीचे मा. चक्रवर्ती वाघमारे, नालंदा धम्मविद्यालयाचे घनःश्याम साळवे, समता नागरी पतसंस्थेचे चेअरमन व्ही टी शिंदे, समता सैनिक दलाचे शिवाजीराव वाव्हळे, सुनील पवार,उत्तमराव शिवभगत, एस.जे. कांबळे, गोपीनाथ हरिभाऊ कांबळे, डी.आर. खंदारे, समता सैनिक दलाचे धम्मानंद साळवे, मार्शल सुबोध कांबळे, डी.आर. जाधव, पी एल वानखेडे, अशोक काळे, ग्यानू मुजमुले, एस एस सोनकांबळे, सूर्यवंशी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य ग्यानोजी गायकवाड यांच्या अभिवादन गीताने झाली. तर सूत्रसंचालन समता सैनिक दलाचे गोपीनाथ कांबळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button