महाराष्ट्रशैक्षणिक

नवी मुंबईत कलाकार, तंत्रज्ञान यांच्या मेळाव्याचे आयोजन, कलाकारांनी मांडल्या व्यथा…

नवी मुंबई – फिल्म अँड थिएटर फेडरेशनच्यावतीने नवी मुंबई, ठाणे व रायगड मधील कलाकार, तंत्रज्ञ यांच्या एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वाशी या ठिकाणी आयोजित केलेल्या या मेळाव्याला अनेक मान्यवर, कलाकार, तंत्रज्ञ यांनी उपस्थिती लावली.

कलाकारांचे क्षेत्र आता मर्यादित राहिले नसून चित्रपट, नाट्य, लघुपट, टीव्ही मालिका यांच्या ही पलीकडे ते आता गेले आहे. सोशल मीडिया तसेच ओटीटीच्या माध्यमातूनही अनेक कलाकार आता आपली कलाकृती सादर करीत आहे. असे करीत असतानाच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन फिल्म अँड थिएटर फेडरेशनने एका मेळाव्याचे आयोजन केले होते.

या मेळाव्याला नवी मुंबई, ठाणे व रायगड मधील अनेक कलाकार तंत्रज्ञानी उपस्थिती लावली होती. यावेळी अनेक कलाकार, तंत्रज्ञांनी आपल्या समस्या या ठिकाणी मांडल्या तर काही कलाकारांनी आपली कलाकृती सादर केली.

अशा प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन नियमित करण्यात येईल अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री व या मेळाव्याच्या मुख्य आयोजिका नयन पवार यांनी सांगितले. तर शीतल सातपुते व सचिन गायकवाड यांनी मेळाव्याच्या आयोजनासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडली.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नाट्य निर्माते जनार्दन लवंगारे तसेच इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button