महाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

विधवा, परितक्त्यांसमवेत हळदी-कुंकू; जुन्या विचारांना तिलांजली!.

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील खवशी येथे विधवा परितक्त्यासमवेत हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.
खवशी ग्रामपंचायतीतर्फे बुधवारी (ता. ८) हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, ॲड. ललिता पाटील, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, ॲड. तिलोत्तमा पाटील, वसुंधरा लांडगे, प्रा.अशोक पवार, गौतम मोरे उपस्थित होते.
या वेळी प्रतिभा शिंदे यांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी लढा उभारण्याचे आवाहन उपस्थितांना केले. स्त्रियांना विधवा न संबोधता एकल महिला संबोधण्याच्या संकल्पनेचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, तसेच स्त्रिया या परिपूर्ण असून, पुरुषांपेक्षा कुठेच कमी नाहीत, असे सांगितले.

या वेळी माजी आमदार स्मिता वाघ, ॲड. ललिता पाटील, ॲड. तिलोत्तमा पाटील, वसुंधरा लांडगे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. अरुण देशमुख यांनी प्रास्ताविक केले. या वेळी गावातील आजी माजी सैनिकांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिजाबराव पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश पाटील, सुरेश भिल, भालेराव पाटील, कैलास सूर्यवंशी, बी. के. सूर्यवंशी, रोहिदास कापडे, लोटन पाटील, कान्हू कापडे, सूर्यकांत कापडे, भगवान गोसावी, आनंदा गोसावी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपशिक्षिका पूनम पवार, प्रसाद कापडे यांनी सूत्रसंचालन केले तर बी. के. सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button