पंचनाम्याऐवजी शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करुन, ती मदत तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करा… मा. नगराध्यक्ष शेख मंजूर…


बीड :(राम भोले प्रतिनिधी ) माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडी घाशी आलेला गहू हरभरा इत्यादी पीक या गारपिटीमुळे उध्वस्त झाले आहेत शेतकऱ्यांच्या तोंडी घाशी आलेला घास हा निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे शेतकऱ्यांचे शेतीतील नुकसान झालेच आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचे मानसिक नुकसान होऊ नये म्हणून माजलगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यां च्या शेतीतील पंचनामे करायची गरज नाही .. कारण नुकसान झालेलेच आहे. म्हणून शासनाने त्यांना तातडीची मदत जाहीर करून त्यांच्या खात्यावर तात्काळ ती वाटप करावी असे मा. नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे त्याचबरोबर ते म्हणाले की

माजलगाव शहरात असे अनेक शेतकरी वर्ग आहेत जे आपली उपजीविका शेतीवरती भागवतात परंतु निसर्गाने त्यांच्यावर प्रहार करून गारपिटीमुळे त्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे म्हणून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने तात्काळ

ही मदत त्यांच्या खात्यावर जमा केली तर त्यांना त्यांचे झालेले नुकसान भरून निघेल तसेच त्यांना मानसिक आधार मिळेल म्हणून शेतकऱ्यांच्या वेदना शासनाने जाणून घ्याव्यात व तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी मागणी मा. नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या वतीने करण्यात आली आहे…

शेतकरी बांधवांसाठी वेळ प्रसंगी आपण रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा देखील शेख मंजूर यांनी दिला आहे
