क्रीडामहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी गुन्हेगारांच्या अंगाचा उडतो थरकाप; कोण आहेत या ‘मर्दानी लेडी सुपरकॉप’?…..

मुंबई, 19 एप्रिल : देशात अशा अनेक महिला आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांचं नाव घेताच गुन्हेगार घाबरतात. अशाच एक ‘सुपरकॉप’ म्हणजे मीरा बोरवणकर होय. त्या महाराष्ट्र केडरच्या IPS अधिकारी आहेत.

अंडरवर्ल्ड डॉनही त्यांना घाबरायचे. बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची भूमिका असलेला ‘मर्दानी’ हा चित्रपट आयपीएस मीरा बोरवणकर यांच्या जीवनापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. चला जाणून घेऊया या दबंग महिला आयपीएसची कहाणी. लेडी सुपर कॉप मीरा बोरवणकर या मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील आहे.

1981 च्या बॅचच्या IPS मीरा बोरवणकर या केवळ महाराष्ट्र केडरमधीलच नव्हे तर देशभरातील सर्वात धाडसी पोलीस अधिकारी आहेत. मुंबईचे अंडरवर्ल्ड नष्ट करण्याचं श्रेय महाराष्ट्र पोलीस दलातील ज्या अधिकाऱ्यांना दिले जाते, त्यापैकी बोरवणकर या एक आहेत. 
मीरा बोरवणकर यांचे वडील ओ.पी. चढ्ढा बीएसएफमध्ये होते.

त्यांचं पोस्टिंग फाजिल्का इथं होतं. त्यामुळे मीरा यांनीही मॅट्रिकचे शिक्षण फाजिल्का येथूनच पूर्ण केले होते. 1971 मध्ये त्यांच्या वडिलांची बदली जालंधरला झाली, त्यामुळे त्यांनी पुढील शिक्षण जालंधरमधूनच पूर्ण केले. मीरा बोरवणकर यांना पोलीस सेवेत येण्याची प्रेरणा देशातील पहिल्या महिला IPS किरण बेदी यांच्याकडून मिळाली.

आयपीएस मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. ज्यामध्ये मुंबई सर्वात महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मुंबईला माफियांच्या तावडीतून मुक्त करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळीतील अनेक गुन्हेगारांना त्यांनी तुरुंगात पाठवलं.

माफियांवर त्यांनी केलेल्या कारवाईचा दरारा अंडरवर्ल्डमध्येही होता
आयपीएस मीरा बोरवणकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा एकमेव दोषी अजमल कसाब आणि 1993 मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेनन यांना फाशी देण्यात आली होती. त्यांनी महाराष्ट्र राज्यातील सीआयडीच्या गुन्हे शाखेतही काम केलं आहे. आयपीएस मीरा बोरवणकर यांचे नाव 1994 मध्ये पहिल्यांदा चर्चेत आल्या होत्या, जेव्हा त्यांनी जळगावमधील एका मोठ्या सेक्स स्कँडलचा पर्दाफाश केला होता. यामध्ये शाळकरी मुलींपासून ते महाविद्यालयीन तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलल्याची बाब समोर आली होती. ही घटना त्या काळात अनेक दिवस देशभर चर्चेचा विषय बनली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button