आरोग्यदेश-विदेशमहाराष्ट्रशैक्षणिक

कोरोनानंतर आता नव्या ‘मंकीपॉक्स’ विषाणूचा शिरकाव, काय आहेत ‘या’ विषाणूची लक्षणे? जाणून घ्या…

मुबंई : मंकीपॉक्स विषाणू सामान्य आजार आहे, हा फक्त काही प्रकरणांमध्ये गंभीर रूप धरण करू शकतो. मात्र, बहुतेक संक्रमित रुग्ण अल्पावधीत बरे होतात. संपूर्ण जग अजूनही कोरोना विषाणूशी (Corona Virus) दोन हात करतं आहे. चीनमधून पसरलेल्या या विषाणूने जगभरात कहर केला होता. कोरोना विषाणूचा धोका अजून टळलेला नाही, तोच आणखी एका नवीन विषाणूने डोकं वर काढलं आहे. ब्रिटनमध्ये ‘मंकीपॉक्स’ (Monkeypox) विषाणूचे एक प्रकरण समोर आले आहे. ज्या व्यक्तीमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे, तो नुकताच नायजेरियातून आला होता. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या (UKHSA) माहितीनुसार, मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे जो सहजपणे पसरत नाही.

यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या मते, मंकीपॉक्स विषाणू सामान्य आजार आहे, हा फक्त काही प्रकरणांमध्ये गंभीर रूप धरण करू शकतो. मात्र, बहुतेक संक्रमित रुग्ण अल्पावधीत बरे होतात.

संबंधित बातम्या

काय आहेत लक्षणे?
तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
कसा वाढतो संक्रमणाचा धोका?
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स रोगावर सध्या कोणतेही अचूक उपचार नाहीत. या रोगाची लागण झाल्यावर, लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णावर उपचार केले जातात. मंकीपॉक्स रोखण्यासाठी कांजण्यांवरचे लसीकरण 85 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button