माजलगाव ते पंढरपूर पालखी मार्ग नव्हे तर मृत्यूचा “सापळा”….

माजलगाव: (प्रतिनिधी) माजलगाव ते पंढरपूर पालखी मार्ग नव्हे तर मृत्यूचा “सापळा” अशा आशयाखाली रामप्रसाद भोले यांनी संताप व्यक्त करणारी पोस्ट केली होती या पोस्टमुळे सोशल मीडियामध्ये “धुमाकूळ” घातला होता याची अनेक वृत्तपत्राने याची दखल घेतली मात्र तरीही रस्ते प्रशासन झोपेचे सोंग करत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की माजलगाव खामगाव ते पंढरपूर या पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात रोड फाटून भगळी तयार झाल्याने यात दुचाकीचे टायर अडकून अनेक लोकांचे प्रांण गेले आहेत तर काही लोकांना अपघातामुळे अपंगत्व आले आहे या संदर्भामध्ये रस्ते प्रशासनाने दखल न घेतल्याने मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर संताप देखील व्यक्त झालेला पाहायला मिळाला हा रस्ता म्हणजे साक्षात मृत्युचा सापळाच आहे म्हणून या संदर्भात अनेक लोकांचा आक्रोश पाहायला मिळाला आहे काही लोकांनी थेट रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत रस्ते प्रशासन मात्र याबाबत निद्रिस्त अवस्थेत असून अजून किती लोकांची बळी घेणार असा सवाल या ठिकाणी नागरिक उपस्थित करत आहेत कारण या रस्त्यावरून अनेक लोकांना जास्त करून दुचाकी वाहनांना रोज ये जा करावी लागते म्हणून तात्काळ या रस्त्याचे दुरुस्तीचे काम न झाल्यास संबंधित कंत्राटदार व कंपनीवर मनुष्यवध व अपंगत्वास जबाबदार अशा अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करावी लागतील काय अशी मागणी रामप्रसाद भोले यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे…