आर्थिकमहाराष्ट्रसामाजिक

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 जून तारीख नोंद करुन ठेवा; नाहीतर…

मुबंई : तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 30 जून ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की, मोफत रेशन घेणाऱ्यांनी 30 जून ही तारीख लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

अन्यथा, तुम्हाला नंतर मोफत रेशनची सुविधा मिळवण्यात अडचण येऊ शकते. आधार आणि रेशनकार्ड लिंक (Aadhaar-Ration Card Link) करणे आवश्यक आहे.
खाद्य विभागाने माहिती दिली
खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेशनकार्ड लिंक करण्याची तारीख जवळ आली आहे. याबाबत शासनाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. रेशनकार्ड आधारशी लिंक केल्यानंतर गरजूंना त्यांच्या वाट्याचे धान्य मिळत आहे की नाही याची खात्री करणे सोपे होईल.
30 जूनपर्यंत लिंक करता येईल
आधी रेशनकार्डला आधारशी लिंक करण्याची तारीख 31 मार्च होती, मात्र नंतर आता ती वाढवून 30 जून करण्यात आली आहे. सरकारने वन नेशन-वन रेशनची घोषणा केल्यापासून रेशनकार्ड आधारशी जोडण्यावर भर दिला जात आहे.
आधार-रेशन कार्ड कसे लिंक करावे

तुमच्या राज्याच्या अधिकृत सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पोर्टलवर जा.
सक्रिय कार्डसह आधार लिंक निवडा.
तुमचा रेशनकार्ड नंबर आणि नंतर आधारकार्ड नंबर टाका.
तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
Continue/Submit बटण निवडा.
आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP मिळेल.
आधार रेशन लिंक पेजवर OTP एंटर करा आणि तुमची विनंती आता सबमिट केली गेली आहे.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला त्याबद्दल माहिती देणारा एसएमएस प्राप्त होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button