आरोग्यआर्थिकदेश-विदेशसामाजिक

उत्तर भारतात पावसाचा कहर, अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत, रेस्क्यू ऑपेरशन सुरु, केंद्राकडून कितीची मदत?…

नवी दिल्ली : या वर्षी पाऊस जोरदार व धो..धो बरसत आहे. सध्या उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली उत्तर प्रदेश या राज्यांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर लोकांचा संपर्क तुटला आहे. अनेक नद्यांना पूर आल्यामुळं या ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान, या पावसामुळं हिमाचल प्रदेशात आत्तापर्यंत 88 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण बेपत्ता असून, 100 जण जखमी झाले आहेत. पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांना एनडीआरफचे जवान रेस्क्यू ऑपेरशन करत बचावकार्य सुरु आहे.
केंद्राकडून मदत.
दरम्यान, हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली उत्तर प्रदेश या ठिकाणी पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. तर पावसाने धूमाकूळ घातला आहे. दरम्यान, आपत्ती निवारण्यासाठी उत्तराखंड राज्याला केंद्र सरकारकडून 413 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांना हवामान स्वच्छ झाल्यानंतरच येण्याचा सल्ला दिला आहे. पंजाबमधील 14 जिल्हे पुराच्या तडाख्यात आले असून 479 गावे बाधित झाली आहेत. उत्तराखंड सरकारने एक हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे.
पर्यटक अडकले.18 राज्यांना पुराचा धोका
पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील 18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे केदारनाथ यात्रेसाठी गेलेले पर्यटक अडकले आहेत. पावसामुळं आत्तापर्यंत 574 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळं अनेक भागात भूस्खलन झालं आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 45 वर्षांनंतर यमुना नदीच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. दिल्लीत यमुनेच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button