आर्थिकदेश-विदेशविशेष

पंतप्रधानांच्या हस्ते आज परभणी येते ५ रेल्वे स्थानकांच्या कामाची पायाभरणी….


परभणी– परभणी लोकसभा मतदारसंघातील ५ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी अमृत भारत स्टेशन योजनेतून तब्बल ११८ कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध झाला असून ६ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी या सर्व स्थानकांच्या कामाची पायाभरणी होणार आहे.
हा निधी परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या अथक प्रयत्नातून मिळाला असून यामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.


भारतीय रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालय यांच्याकडून देशभरातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा समावेश अमृत भारत स्टेशन योजनेत करून त्यांच्या पुनर्विकासासाठी भरघोष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दक्षिण मध्ये रेल्वे विभागातील एकूण १३ रेल्वे स्थानकांचा समावेश सदर योजनेत करण्यात आला असून यापैकी ५ रेल्वे स्थानके हे परभणी लोकसभा मतदारसंघातील आहेत. यामध्ये परभणीसह पूर्णा, गंगाखेड, सेलू आणि परतूर या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
परभणी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी या योजनेतून २५ कोटी ९० लाख तर गंगाखेड रेल्वे स्टेशनसाठी २४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. पूर्णा जंक्शनसाठी २३ कोटी ७० लाख, सेलू रेल्वे स्टेशनसाठी २३ कोटी २० लाख आणि परतूर रेल्वे स्टेशनसाठी २२ कोटी ८ लाख असा एकूण ११८ कोटी ८८ लाखांचा निधी परभणी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांसाठी मिळाला आहे.
विशेष म्हणजे या स्थानकांच्या विकासात्मक कामांची पायाभरणी दि. ६ ऑगस्ट २०२३, रविवार रोजी ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी केली जाणार आहे. परभणी हे मराठवाड्यातील प्रमुख जंक्शन असून या जंक्शनसाठी या निधीतून नवीन इमारत उभारली जाणार आहे. तसेच प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परभणी जिल्ह्यातील ४ व जालना जिल्ह्यातील १ अशा परभणी लोकसभा मतदारसंघातील ५ रेल्वे स्थानकांसाठी हा निधी मिळाला असून लवकरच या रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. हा निधी खा. संजय जाधव यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे मिळाला असून यातून विकासाचे मोठे काम होणार आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० टक्टे कोटा रद्द करवून दिल्यानंतर आणि परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळवून दिल्यानंतर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांसाठी भरघोष निधी मिळवून दिला हे खा. जाधव यांचे मोठे यश आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button