क्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

पोलीस दलात ४९४ उपनिरीक्षक दाखल !

मुबंई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १२२ व्या तुकडीत सहभागी झालेल्या ४९४ उपनिरीक्षकांची कुमक शनिवारी पोलीस सेवेत दाखल झाली. या तुकडीत ३४९ पुरुष, तर १४५ महिला आहेत.
त्यातील ८८ टक्के पदवीधर, तर १२ टक्के पदव्युत्तर आहेत. तीन वैद्यकीय, १८ (बी. टेक), १४५ अभियांत्रिकी पदवीधारक (बीई), ५५ व २७९ पदवीधर असल्याचे प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी सांगितले.
या तुकडीत ३० ते ३५ वयोगटातील उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तुकडीचे सरासरी वय ३४ वर्ष आहे. तुकडीत कोकण विभागातील सर्वात कमी म्हणजे २३ जणांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील १६३, मराठवाड्यातील १२८, उत्तर महाराष्ट्रातील १०३, विदर्भातील ७१ आणि गोव्यातील एकाचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
पोलीस अकादमीत सकाळी आठ वाजता हा दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर,
राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या अपर महासंचालक अर्चना त्यागी, अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, विशेष महानिरीक्षक बी. जी. शेखर, अधीक्षक शहाजी उमाप यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button