आर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रशैक्षणिक

इन्कम टॅक्सच्या नावानं असा मेसेज आला तर सावध व्हा ; होऊ शकते फसवणूक…..

पुणे :31 जुलै Income Tax Return (ITR) भरण्याची शेवटची तारीख होती. यानंतर जे व्यक्ती आयकर रिटर्न भरतील त्यांना आर्थिक दंड आकारला जाणार आहे. आपल्यापैकी जवळपास सर्वांनीच इन्कम टॅक्स रिटर्न वेळेतच भरला असेल.
परंतु याचाच कालावधीचा फायदा घेत एक मॅसेज व्हायरलं होत आहे. ‘कर भरल्यानंतर इन्कम टॅक्स विभागातर्फे तुम्हाला १५ हजार ४९० रुपये रिफंड मिळतील,’ अशी माहिती या मेसेजमध्ये आहे. पण खरं तर हा मेसेज खोटा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मॅसेजवर विश्वा ठेऊ नका यातून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे असा कोणताही मॅसेज आला तर सावध रहा.
या मॅसेज मध्ये काय ?
‘कर भरल्यानंतर १५ हजार ४९० रुपये तुम्हाला रिफंट मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला आपल्या बँक अकाउंटची माहित व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. अन् त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून संबंधीत माहिती भरा.’ असा मेसेज सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. पण हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. इन्कम टॅक्स विभागानं असा कुठलाही मेसेज आपल्या करदात्यांना पाठवलेला नाही.
PIB फॅक्ट चेक
या संदर्भात PIB फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार या मेसेजच्या माध्यमातून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे असा मेसेज येताच सावध व्हा. असे मेसेज कोणालाही फॉरवर्ड करू नका. अन् तुम्हाला जर टॅक्स संदर्भात कुठलीही माहिती जाणून घ्यायची असेल तर इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. (https://www.incometax.gov.in/iec/foportal/) तिथे तुमच्या सर्व शंकांचं निवारण केल जाईल. पण अशा फॉरवर्डेड मेसेवर विश्वास ठेऊन कुठेही लॉग ईन करू नका. असा मॅसेज PIB ने ट्विट केला आहे.
हा फेक मेसेज होतोय व्हायरल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button