आरोग्यआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

समाजहित अभियान प्रतिष्ठान आयोजित “समाजहित गौरव पुरस्कार 2023” सोहळा संपन्न..

परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर ) शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा दिनांक 8 ऑगस्ट रोजी तृतीय वर्धापन होता त्या निमित्त शहरातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समाजहित अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने “समाजहित गौरव पुरस्कार 2023” सोहळा दिनांक 10 ऑगस्ट रोजी शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यात सामाजिक क्षेत्रात जिवाजी रंगनाथ वाघमारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच शेख सरफराज, शिवाजी नेटके, शिवाजी प्रल्हाद कोकाटे, संदीप भीमराव वायवळ, वसीम मोमीन, सलीम इनामदार (लोकश्रेय मित्र मंडळ), अर्जुन पंडित, प्रदीप लांडगे, रामदास साखरे, रमेश कदम, सतीश धोत्रे(ईश्वरी ई सेवा केंद्र), नितीन जाधव महाराज(प्राणी मित्र), विश्वनाथ गवारे स्वच्छ्तादुत कावळे मामा, आबेद मुल्ला आदींना तसेच वैद्यकीय क्षेत्रात डॉ. धनश्री गोंटे, तेजस्विनी मधुकर कांबळे यांना, पत्रकारिता व सांस्कृतिक क्षेत्रात निरुद्दिन जाविद सिद्दिकी यांना, क्रीडा क्षेत्रात शेख जुनेद शेख शेरु, प्रतीकेश चवरे यांना तसेच पत्रकारिता क्षेत्रात भूषण मोरे(दैनिक शिल्पकार), शिवशंकर सोनूने (दैनिक लोकमंथन) दिलीप बनकर(परभणी न्यूज), संघपाल अढागळे(सा.हर्ष नगरी) , धम्मपाल हानवते(दैनिक क्रांतिशस्त्र) ,अनिल खंदारे(पत्रकार मंठा), शेख इसाक शेख सलीम(दैनिक मुस्लिम समाज संघर्ष न्यूज) आदींना “समाजहित गौरव पुरस्कार 2023” सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला महिला दक्षता समिती परभणी जिल्हाधिकारी कार्यालय सदस्या अनिताताई सरोदे, सुमनताई सोनटक्के, मानवाधिकार जिल्हाध्यक्ष वंदना हाके, पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस अधीक्षक कार्यालय राणी चोपडे, सामाजिक कार्यकर्त्यां उषा पंचांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या वेळी फारुख खान, रावसाहेब भदरगे, माणिकराव अंधारे, मुकेश अंधारे, संभाजी शेवटे, संदिप प्रधान, ज्ञानेश्वर गायकवाड, तसेच संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सचिव जनसेवक रमेश घनघाव, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, संदिप वायवळ, प्रदीप लांडगे आदींच्या परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button