महाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीय

मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्य सरकारच्या वेगवान हालचाली, मुंबईतून आली मोठी अपडेट….

मुंबई, 3 सप्टेंबर : जालन्यातल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्य सरकारने वेगवान हालचाली करायला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवारी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी 12 वाजता ही बैठक होईल. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीमधील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत.याच बैठकीला मराठवाडा विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, परभणी, अहमदनगर, जालना, नांदेड, लातूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक असे सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील.गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतरही तोडगा नाहीगिरीश महाजन यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांची प्रत्यक्ष भेट घेतली. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी महाजनांनी चर्चा केली मात्र जरांगे पाटील यांनी दोन दिवसात आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतली. गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

आरक्षणाच्या मागणीसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याकरता एक महिन्याचा तरी वेळ द्या, अशी विनंती गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांना केली, पण जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातले आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.आपण दोन दिवसांचा आग्रह धरू नका, अशी माझी विनंती आहे. जर आपल्याला खरंच कायमस्वरूपी न्याय द्यायचा असेल. कुणी कोर्टामध्ये गेलं तर एका दिवसामध्ये ते फेटाळलं जाईल. दोन दिवसांमध्ये हे होणार नाही.

असा जीआर बळजबरी काढला तरी तो एका दिवसाच्या वर कोर्टामध्ये टिकणार नाही, म्हणून मी मनोज पाटील यांना एक महिन्याची वेळ द्यावी, अशी विनंती केली आहे, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.सरकारने मराठवाड्यासाठी दोन दिवसांमध्ये आम्हाला निरोप पाठवावा, महाजन साहेबांनी अध्यादेश घेऊन यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. उर्वरित महाराष्ट्रासाठी मात्र आम्ही त्यांना तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. सरकारने दोन दिवसात नाही दिलं तर तीन महिन्यांचा काळही आम्हाला कमी करावा लागेल. आम्हाला खूप मोठा लढा लढावा लागेल. आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत, असं जरांगे पाटील गिरीश महाजन यांना म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button