देश-विदेशशैक्षणिक

G 20 साठी भारताने स्वीकारले झिरो ट्रस्ट मॉडल, जाणून घ्या हे काय आहे; अशी असावी सुरक्षा…

न्यू दिल्ली : G20 च्या आयोजनासाठी भारताने झिरो ट्रस्ट मॉडल लागू केले आहे. हे झिरो ट्रस्ट मॉडेल काय आहे. याला लागू का करावे लागले? G-20 समिटची सुरवात आजपासून झाली. जगातील काही देशांचे राष्ट्राध्यक्ष या समिटमध्ये सहभाग घेतला.

याच्या आयोजनासाठी भारताने खूप मोठी व्यवस्था केलेली आहे. यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सुरक्षा व्यवस्था. राष्ट्राध्यक्षांना ठरवलेल्या ठिकाणी सुरक्षित आणण्यासाठी झिरो ट्रस्ट मॉडेल लागू करण्यात आले आहे. सायबर अटॅक होऊ नये, हाही यामागचा उद्देश आहे. चीन आणि पाकिस्तानपासून धोका असल्याने अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.


काय आहे झिरो ट्रस्ट मॉडल?
वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन आणि पाकिस्तानच्या सायबर अटॅकर्सवर भारतीय सुरक्षा एजन्सी नजर ठेवून आहेत. सायबर अटॅक होऊ नये, यासाठी भारतीय सुरक्षा एजन्सीज सतर्क आहेत. भारताने पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा केली आहे. भारताची आयटी सिस्टीम सुरक्षा यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहे. यासंदर्भात भारताला कोणताही धोका स्वीकारायचा नाही. हे आहे झिरो ट्रस्ट मॉडल. हॉटेलपासून सर्व महत्त्वाच्या ठिकाणी हे धोरण लागू करण्यात आले आहे.


गृह मंत्रालयाचा सायबर विभाग प्रत्येक उपकरण आणि खाजगी नेटवर्कवर लक्ष ठेवत आहे. सुरक्षा टीम प्रत्येक वस्तु , प्रत्येक भाग तपासत आहे. कोणत्याही बाहेरील उपकरणावर किंवा वस्तूवर विश्वास ठेवत नाही. याबाबत परदेशी पाहुणे असलेल्या प्रत्येक हॉटेलला गाइडलाइन दिली गेली आहे.


सुरक्षेची जबाबदारी कुणावर?
G 20 आयोजनात सायबर सुरक्षेची जबाबदारी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर्गनायझेशन DRDO च्या काम्प्युटर इमरजन्सी रिस्पान्स टीम (CERT) च्या हातात आहे. याशिवाय दिल्ली पोलीस सायबर युनिटीवर नजर ठेवून आहेत. हॉटेल मालिक यांना वायफाय सुरक्षा आणि डिव्हाईस मॉनिटर आणि नेटवर्क एक्सेसला मॉनिटर करण्यास सांगण्यात आलंय.


VVIP असणाऱ्या हॉटेल्समध्ये सायबर स्टेशन
दिल्लीतील २८ हॉटेल्समध्ये VVIP च्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेसह हे हॉटेल्स हायटेक करण्यात आले आहेत. आयटीसी मौर्य, इरोज हॉटेल, रेडिसन ब्ल्यू, ताज हॉटेल, प्राईड हॉटेल, होटल ग्रँड, एम्बेसडर बाय ताज, द अशोक, अंदाज डेल्ही, द लोधी, द लीला, द सूर्या, इम्पिरीयल, द ओबेरॉय, आयटीसी भार गुडगाव आदी हॉटेल्समध्ये सायबर स्टेशन तयार करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button