राज्यातील बौद्ध व मागासवर्गीयांवरील अन्याय, अत्याचार ,दुर करुन व कोरडा दुष्काळ जाहीर करा .डॉ राजेंद्र गवई ( रि पा इं राष्ट्रीय नेते )

बीड :अंबेजोगाई येथे आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पार्टीच्या पदाधिकारीची विशेष बैठक घेण्यात आली त्या मध्ये आज भारतत व महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाना वर बौद्धांवर अन्याय अत्याचार वाढले असून, अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करुन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच राज्यात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे तेव्हा राज्य शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी असे प्रतिपादन डॉ राजेंद्र गवई राष्ट्रीय नेते व राष्ट्रीय महासचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी अंबाजोगाई येथे आयोजित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या जिल्हा बैठकीत महाराष्ट्र शासनाला आवाहन केले.तसेच या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना मुंबई येथील मंत्रालयात जाऊन शिष्टमंडळाला घेऊन भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.त्यावेळी पंडित टोमके, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रामराम दाभाडे राष्ट्रीय कोष्याध्यक्ष, मिलींद मोकळे कार्याध्यक्ष, माणिक वाघमारे जिल्हा अध्यक्ष, नारायण वाघमारे जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब काकडे युवक जिल्हाध्यक्ष, महेंद्र वडमारे शहराध्यक्ष बीड,बब्रुवान सोनवणे, रामराम जोगदंड, प्रकाश घोरपडे, अक्षय सोनवणे, सोमनाथ इंगळे भगवान सरवदे इत्यादी अनेक जण उपस्थित होते.