आरोग्यमहाराष्ट्रविशेषसामाजिक

गरजू रुग्णास प्लेटलेट ने मिळाले जीवदान ;दयावान सरकार ,परभणी ग्रुप ने केली मदत ….

परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) महाराष्ट्र भर आपल्या सामाजिक कार्याने परिचित असलेल्या, गोर गरीब गरजू लोकांच्या न्याय हक्कासाठी, होईल ती मदत करण्यासाठी सदव्य तत्पर असणारी सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे यांना परभणी शहरातील देवगिरी हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णासाठी प्लेटलेट्स च्या 4 बॅग ची आवश्यकता असल्या बाबत चा मदतीतीसाठी चंद्रकांत बचाटे हे दयावान सरकार परभणी जिल्हा कार्यालय येथे दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी संपर्क साधला. तेंव्हा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीपभाई निकुंभ, डोंबिवली कार्याध्यक्ष ऍड.सुभाष अंभोरे, मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड, परभणी जिल्हा अध्यक्ष रघुवीरसिंगभाई टाक यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान प्रमोद अंभोरे व सचिव जनसेवक रमेश घनघाव यांनी तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय मेट्रो ब्लड बँक येथे जाऊन संबधीत ब्लड बँक अधिकारी यांच्याशी बोलून सदरील रुग्णास प्लेटलेट्स च्या 4 बॅग उपलब्ध करून देऊन मदत केली आहे.
यावेळी रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, उपाध्यक्ष शेख सरफराज बबनअण्णा मुळे, बँक कर्मचारी सचिन पवार, दीपक कंडेरे, अनिल सावंत, नारायण अंभोरे आदींचे सहकार्य लाभले. प्लेटलेट वेळेत उपलब्ध करून देऊन मदत केल्या बद्दल रुग्णाचे नातेवाईक दादाराव पवार यांनी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button