महाराष्ट्रशहरशैक्षणिक

गौतम नगर माजलगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त बैठक संपन्न,अध्यक्षपदी “श्याम साळवे” यांची “बिनविरोध निवड”


बीड :(प्रतिनिधी-रामप्रसाद भोले )माजलगाव शहरात प्रति वर्षा प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीचे औचित्य साधून भव्य जयंती उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने बैठकीचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे करण्यात आले. यात काही ठराव घेऊन कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यात अध्यक्षपदी श्याम भाऊ साळवे उपाध्यक्ष वीरेंद्र मेंडके सचिव फारूक अण्णा सहसचिव युवराज मिसाळ कोषाध्यक्ष सुभाष चंदनशिव संघटक शेख दिलावर सल्लागार सुशांत भैय्या पौळ अशोक लांडगे सर समाधान नरवडे प्रसिद्धीप्रमुख रामप्रसाद भोले मार्गदर्शक रामभाऊ गायकवाड बाबासाहेब साळवे कैलास टाकणखार
प्रमुख मार्गदर्शक शेख आसेफ भाऊ


यासह अनेक मार्गदर्शक म्हणून कार्यकारणीवर घेण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या दिवशी 14 एप्रिल ला सकाळी निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण दिवसभर लहान मुलांच्या विविध स्पर्धा आणि सायंकाळी पाच वाजता बाबा आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गौतम नगर येथून निघणार आहे तसेच 13 तारखेला रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक गौतम नगर येथे 133 तोफांची सलामी बाबासाहेबांना देण्यात येणार आहे असा भरगच्च कार्यक्रमांचा खजिना या माध्यमातून पाहायला मिळणार आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली या बैठकीचे या बैठकीस शेकडो तरुण युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button