महाराष्ट्रसामाजिक

अन्याय प्रतिकार दलाचे अधिकृत उमेदवार समशेर खा पठाण यांना मतदारांचा वाढता पाठिंबा…..


माजलगाव (प्रतिनिधी) सध्या बीड लोकसभेमध्ये विविध पक्षाच्या उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी चालू असून अन्याय प्रतिकार दल या सामाजिक संघटनेचे अधिकृत उमेदवार समशेर पठाण हे सुद्धा माजलगाव तालुक्यासह विविध ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत सध्या सत्ताधारी व इतर पक्षांच्या टीका टिपण्या चालू आहेत परंतु समशेर पठाण हे विकासाचा मुद्दा बेरोजगारी बीड रेल्वे उद्योग व रोजगार जनतेच्या मूलभूत गरजा रस्ते पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना व इतर महत्त्वाचे मुद्दे घेऊन लोकांमध्ये मिसळत आहेत लोकांमध्ये जाऊन आपणास संधी मिळाल्यास आपण संधीचं सोनं करू असे ते लोकांशी बोलत असल्याने व ते गरीब उमेदवार असल्याने लोक त्यांनाच चहापाणी करून समशेर पठाण यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याची साक्ष देत आहेत प्रचाराच्या रणधुमाळीत समशेर पठाण हे बाजी मारत असून त्यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे अन्याय प्रतिकार दल या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपण बीड जिल्ह्याला वैभव प्राप्त करून देणार असल्याचे समशेर पठाण हे मतदारांना सांगत आहेत संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करत करत व मतदारांच्या भेटीगाठी घेऊन युवा तरुण वयस्कर लोकांचा ते आशीर्वाद घेत आहेत त्यामुळे समशेर पठाण यांनी प्रचार आघाडी घेतली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button