आरोग्यदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषसामाजिक

मुंबईत पुन्हा 26/11 ची पुनरावृत्ती; मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज…

मुंबई :मुबंई पोलिसांच्या  ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आला आहे.
26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. भारताबाहेरील क्रमांकावरून मेसेज आल्याची माहिती मिळत आहे. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज आला. मेसेज करणाऱ्यानं म्हटलंय की, जर त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलंय की, भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासोबतच दुसऱ्या तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये संशयास्पद बोट
यापूर्वी, गुरुवारी सकाळी राज्यातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. दहीहंडीचे कार्यक्रम आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर बोटीवर शस्त्रं सापडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र या प्रकरणात कोणताही दहशतवादी संबंध सापडला नसल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. या संशयास्पद बोटीचं नाव लेडी हान असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेकडे असल्याची माहिती फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली होती. या बोटीतून तीन ‘अ‍ॅसॉल्ट रायफल’, स्फोटकं आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.
अधिकाऱ्यांकडून तपास
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नौकेची मालक एक ऑस्ट्रेलियन महिला आहे. मात्र, या घटनेमुळे सुरक्षेला कोणताही धोका नाही आणि दहशतवादाशी कोणताही संबंध अद्याप समोर आलेला नाही, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून बोटीची तपासणी केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचं तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button