महाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

देशभर साजरा केला जातोय ईद-ए-मिलाद, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व….

परभणी : इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’  म्हणून साजरा करण्यात येतो.
ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी घरं आणि धार्मिक ठिकाणं आकर्षक रोषणाईने सजवले जातात, प्रार्थना केली जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. या दिवशी हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचं, कुराणाचं पठण केलं जातं.
इस्लाम धर्मात दान करण्याला मोठं महत्व आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने आजच्या दिवशी गरिबांमध्ये अन्नदान केलं जातं. ईद-ए-मिलाद-उन-नबीचा आजचा दिवस हा मालविद या नावानेही ओळखला जातो.इस्लामिक कॅलेंन्डरनुसार, ईद-ए-मिलाद-उन-नबी सण तिसऱ्या महिन्यात साजरा केला जातो. हा सण भारत, पाकिस्तान, बांग्लादेश तसेच जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सुन्नी आणि शिया हे दोन पंथ वेगवेगळ्या दिवशी ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण साजरा करतात.
ईद-ए-मिलाद-उन-नबी चा इतिहास
इस्लाम कॅलेन्डरच्या तिसऱ्या महिन्यातील 12 तारखेला, इसवी सन पूर्व 571 मध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता. सर्वात आधी हा सण इस्त्रायलमध्ये साजरा करण्यात येत होता. त्यानंतर अकराव्या शतकापासून जगभरात हा सण साजरा करण्यात येऊ लागला. असे म्हणतात की मोहम्मद साहेब 6 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे अबू तालिब आणि आजोबा अबू मुतालिब यांनी प्रेषित मुहम्मद यांना वाढवले. अल्लाहने सर्वप्रथम प्रेषित मुहम्मद यांना कुराण दिले, अशी इस्लामची श्रद्धा आहे. ज्यानंतर प्रेषित मोहम्मद यांनी पवित्र कुराणचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला.
ईद-ए-मिलाद-उन-नबी चे महत्व
या दिवशी रात्रभर अल्लाहची पूजा केली जाते. पवित्र कुराण घरे आणि मशिदींमध्ये वाचले जाते. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने सर्वत्र मिरवणुका काढण्यात येतात. मशिदीमध्ये नमाज पडण्यात येतात, त्याचवेळी पैगंबरांचा संदेशाचा सर्वत्र प्रसार करण्यात येतो. आजच्या दिवशी गरिबांमध्ये अन्नाचे दान केलं जातं.
असा सण साजरा करतात
ईद मिलाद उन नबीच्या दिवशी प्रार्थना आणि संदेश वाचण्याबरोबरच गरीबांना देणगी देखील दिली जाते. त्यांना जेवण दिले जाते. या दिवशी जे लोक मशिदीत जाऊ शकत नाहीत, ते त्यांच्या घरी कुराण पठण करतात. इस्लाममध्ये असा विश्वास आहे की ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या दिवशी कुराण पठण केल्याने अल्लाहची दया येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button