
वाशिम ; सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत या निमित्ताने वाशिम येथे विशेष सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा झाला या वेळी अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम चे सचिव मा. न्यायाधिश विजयकुमार टेकवाणी, जात पडताळणी समिती पोलिस उप अधिक्षक सुहास सातार्डेकर,पोलिस उपविभागीय अधिकारी देवपुजारी, समाज भुषण पुरस्कार प्राप्त सु. ना. खंदारे, दिपक ढोले, शिवमंगल अप्पा राऊत, प्रकाश गवळीकर, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते गोपाळराव आटोटे गुरूजी, शाहिर संतोष खडसे अविनाश कांबळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वाशिम चे मारोती वाठ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एनडीएमजे चे राज्य सहसचिव तथा जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिम चे पी एस खंदारे हे होते…
पी एस खंदारे यांनी सामाजिक न्यायाची भुमिका मांडताना सामाजिक न्यायाचे उद्गाते फुले, शाहू, आंबेडकर यांना जी समाज रचना अपेक्षित होती ती स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षातही पुर्ण झाली नाही. भारतीय राज्य घटणेच्या ऊद्देशिकेत नमुद केल्या प्रमाणे सामाजिक समता व दर्जाची व संधीची समानता निश्चित पणे प्राप्त करून देण्याचा व व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता यांची विस्तृत मांडणी आपल्या भाषणात केली. एकीकडे सरकार विविध प्रकारच्या घोषणा व कल्याणकारी योजना तयार करते तर दुसरीकडे बजेट इतरत्र वळवते, म्हणून बजेटचा कायदा झाला पाहिजे, व आकस्मिकता योजना मंजुरीसाठी देखील मुख्यमंत्र्यांनी भुमिका घ्यावी, उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती ची स्थापना करावी, यासह एनडीएमजे चे राज्य महासचिव एड डाॅ केवलजी ऊके यांनी जो मसुदा तयार करून शासनाला सादर केला आहे त्यांची अमलबजावणी कर्नाटक, केरला आणि आंध्रप्रदेश, राजस्थान सरकार करते परंतु पुरोगामी महाराष्ट्राचा व फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणारे महाराष्ट्र सरकार मात्र ती भुमिका घेत नाही. ज्या समाजाच्या व्यथा जानून घ्यायची असेल तर त्या समाजात जन्म घ्यावा लागतो, आई व दाई मधे खुप फरक आहे, आई हि आईच असते दाई फक्त दिखाऊ पणाच्या कळा देते हे होऊ नये म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मंत्री हा बौद्ध, अनुसूचित जाती मधूनच असावा हि मागणी देखील पी एस खंदारे यांनी केली, काही अधिकारी प्रामाणिक पणे योजना राबवण्याचा प्रयत्न करतात परंतु विहिरीतच नाही तर पोह-यात काय येईल यांची जाणिव देखील करून दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात तरी अनुसूचित जाती जमाती च्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने प्रयत्न करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिवसे यांनी तर आभार राठोड मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वाशिम च्या अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले